भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर अमळनेरमध्‍ये; उष्ण लाटेच्‍या बचावासाठी खास सोय

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगलग्रह मंदिर देवस्थान हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर म्हणून ओळखले जात असल्याने या ठिकाणी संपूर्ण देश भरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र सध्या जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका भाविकांना बसत असल्याचे लक्षात आल्यावर मंदिर संस्थांच्यावतीने मंदिर परिसरात ठिकाणी पाण्याचे फवारे उभारण्यात आले असून या फावाऱ्यांमुळे परिसरातील तापमानात (Temperature) पाच ते दहा अंश तापमान हे कमी राहत असल्याने याचा फायदा जसा भाविकांना होत आहे
मंगळग्रह देवतेची भारतात केवळ दोन मंदिर आहेत. त्यातील अमळनेर (Amalner) येथील मंदिर मानले जाते. अतिशय पुरातन काळापासून असलेले हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून आता चांगलेच नावारूपाला आले आहे. ज्याच्या पत्रिकेत मंगळ आहे; त्यांच्यासाठी या मंदिरात दर्शन घेतल्याने त्यांच्या आयुष्यात मंगलमय होते. त्याचबरोबर विवाह (Marriage) योग्य तरुण– तरुणींनी दर्शन घेतल्यावर त्यांचे लवकरच विवाह जुळून येत असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करीत असतात

तापमानाची तिव्रता केली कमी

अमळनेर परिसर नेहमीच दुष्काळग्रस्त असल्याने या भागात पशू पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी जगणे कठीण असल्याचे लक्षात आल्यावर मंदिर संस्थानच्‍यावतीने जाणीवपूरक पशू पक्षी यांच्या निर्वाहासह त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोई करून देण्यात आल्या आहेत. त्यात वाढत्या तापमानात त्यांना दिलासा मिळावा; यासाठी संपूर्ण मंदिर परिसरात तुषार सिंचन लावण्यात आल्याने या परिसरातील तापमानात मोठी घट झाल्याने वाढत्या उष्णतेच्या लाटेत भाविकांना फायदा होत आहे.

पक्षांसाठीही बनले निवारा केंद्र

या वातावरणाचा पक्षांना ही मोठा दिलासा मिळाला असल्याने हजारोंच्या संखेने देशी विदेशी पक्षांनी या मंदिर परिसरात आपला निवारा तयार केला आहे. दिवस रात्र पक्षांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजून गेला आहे. पक्षाचे पर्यावरणातील महत्‍त्व लक्षात घेता त्यांची संख्या वाढविण्यासाठी मंदिर संस्थानला ज्या काही उपाय योजना कराव्या लागतील त्या आम्ही करणार असल्याच संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default