पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला आग (Fire) लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ४.४० च्या सुमारास ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मेट्रो स्टेशनच्या ५४४ क्रमांकाच्या खांबाजवळ असलेल्या इमारतीला आग लागली असून ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पश्चिम दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग (Fire) लागली. पोलिसांनी इमारतीतून ६०-७० लोकांना बाहेर काढले होते. काही लोक अजूनही आत अडकल्याचेही त्यांनी सांगितले. आगीची माहिती दुपारी ४.४० च्या सुमारास मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यापूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला असून, तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले.
