अहमदनगर: सोशल मीडिया वर महिलांची बदनामी करणारे अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु अहमदनगर मध्ये महिलांनीच महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल करून बदनामी केल्याचा प्रकार समोर आलाय. महिलांची बदनामी केल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतके दिवस पुरुष महिलांची बदनामी सोशल मीडियातून करत होते. मात्र, महिलाच महिलांची बदनामी करत असल्याचे चित्र समोर आल्याने पोलिस देखील चक्रावले आहेत.
अहमदनगरमधील महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन मैत्रिणी पैकी एकीने आपल्याच मैत्रिणीचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट ओपन करून अश्लील मेसेज व्हायरल केले. त्याचा तपास करत असताना मैत्रिणीनेच बोगस अकाउंट ओपन करून बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात पोलिसांनी त्या आरोपी मैत्रिणीला अटक देखील केलीय.
गेल्या वर्षभरात फेसबुक, इंस्टाग्रामचे बनावट अकाउंट उघडून बदनामी करण्याच्या तक्रारी या जवळपास १० होत्या. परंतु या वर्षी केवळ ५ महिन्यात हा आकडा १५ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे सायबर गुन्ह्यात लहान मुले देखील सहभागी असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्या वर लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिस निरीक्षक, भोसले यांनी केले आहे.
सध्या सोशल मीडियाचा वापर वाढलाय. परंतु आपसातील भांडण, एक मेकांवर असलेला राग द्वेष हा सोशल मीडिया च्या माध्यमातून एखाद्या व्यकीची बदनामी करण्यासाठी वापर हल्ली जास्तच वाढलाय. यात पुरुषांबरोबर आता महिलाही सायबर क्राईम माध्यमातून गुन्हेगारी कडे वळताना पाहायला मिळताहेत.
