PI मॅडमसह स्वत:साठी घेतली १२ हजारांची लाच; हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात

फुले शाहू आंबेडकर
0
महिला पोलीस निरीक्षकांनी गुटखा विक्रेत्याकडे महिन्याला २५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती दरमहा १० हजारांचा हप्ता घेण्याची तयारी मॅडमनी दर्शवली.
औरंगाबाद : आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अनेक अवैध धंद्यांना वैध करण्यासाठी पोलीस दुकानदारांकडून हप्ते घेतल्याच्या बातमी आपण ऐकत असतो. मात्र, त्यांची ही हप्तेखोरी कधी-कधी उघड होते. अशीच एका महिला पोलीस निरीक्षकाची आणि हवालदाराची हप्तेखोरी एसीबीने उघड केली आहे. एका गुटखा विक्रेत्याकडे दरमहा २५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली असता या पी.आय मॅडमसह हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्प लिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.
दौलताबाद पोलीस स्टेशनला (Daulatabad Police Station) २ महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या महिला पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी गुटखा विक्रेत्याकडे महिन्याला २५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती दरमहा १० हजारांचा हप्ता घेण्याची तयारी या मॅडमनी दर्शवली. दरम्यान, रजेवर असलेल्या मॅडमसाठी १० हजार आणि स्वत:चे २ हजार अशी एकूण १२ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी दौलताबादेत रंगेहाथ पकडलं आहे.
पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ आणि पोलीस हवालदार रणजीत सहदेव शिरसाट या दोघांनी २ महिन्यांपूर्वी चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरू केलेला एक दुकानदार असल्याचं दौलताबाद पोलिसांना समजलं. त्यानंतर एका हवालदाराने गुटखा विक्रेत्याला पोलिस स्टेशनला बोलावून घेतलं आणि त्याची भेट आपल्या मॅडमशी करून दिली. तेव्हा मॅडमनी त्याला दोन दिवसांनंतर ये, असे सांगितले. त्यांचा उद्देश समजल्याने गुटखा दुकानदाराने ACB कार्यालयात तक्रार नोंदविल्याचं एसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, एसीबी अधिकाऱ्यांनी या दुकानदाराला २४ मार्च रोजी पोलिस ठाण्यात पाठविलं, तेव्हा हवालदार रणजीत त्याला भेटला आणि त्याला घेऊन मिसाळ यांच्या केबिनमध्ये गेला. यावेळी तक्रारदारासोबत एसीबीचा पंचही गुटख्याचा होलसेल डीलर असल्याचं सांगून मॅडमसमोर गेला. दरम्यान, मिसाळ यांच्या सांगण्यावरून रणजीतने या दोघांची झडती घेतली. त्यामध्ये यांच्याकडे असणारा रेकॉर्डर पोलिसांना सापडला नाही. यावेळी पोलिस स्टेशनमध्ये दुकानदाराला दरमहा २५ हजार रु. हप्ता आणि एक केस केली जाईल, असे बजावलं. मात्र, आता नव्यानेच हा धंदा सुरू केल्यामुळे एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचं दुकानदाराने सांगितलं. शेवटी त्याने १० हजार हप्ता देण्याची तयारी दर्शविली आणि केबिनमधून बाहेर आल्यानंतर हवालदार सिरसाट म्हणाला की, आम्ही गरीब आहोत, वेगळे दोन हजार माझे असतील. २-३ दिवसांत आणून देतो, असं सांगून तक्रारदार बाहेर गेला.

या सर्व प्रकरणानंतर ४ दिवसांत तक्रारदाराची आजी वारल्याने तो गावी गेला. दरम्यान, हवालदाने तक्रारदाराकडे हप्त्यासाठी तगादा लावला. गुरुवारी मॅडम रजेवर असल्याने दोघांचे १२ हजार रुपये घेऊन सिरसाटने त्यास बोलावले. लाच घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पोलिसांनी त्या हवालदाराला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मारोती पंडित, पोलीस निरीक्षक एन.एच. क्षीरसागर, हवालदार राजेंद्र जोशी, प्रकाश घुगरे, चांगदेव बागूल आणि आशा कुंटे यांनी केली. हवालदारास अटक केली असून रजेवर असणाऱ्या महिला पी.आयचा शोध सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default