मिळालेल्या माहितीनुसार, मनोज रविंद्रन पिल्लईचे त्याच्या ओळखीतील रेम्या नावाच्या
तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात पत्नी शरण्या एस पिल्लई ऊर्फ शरण्या मनोज पिल्लईने आडकाठी केली. त्याचा राग मनात धरून मनोज पिल्लई हा नेहमी पत्नी शरण्याला शिवीगाळ दमदाटी मारहाण करून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. याच जाचाला कंटाळून पत्नी शरण्याने २४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मृत शरण्याचे नातेवाईक धनुजा मेझुवाना कार्थीयायनीउ (वय ५५) यांनी सोमवार ९ मे रोजी पोलिसात तक्रार दिली. शरण्याच्या मृत्यूस तिचा पती मनोज रविंद्रन पिल्लई हाच कारणीभुत असून त्याने पत्नी शरण्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरुन भुसावळ तालुका पोलीस स्थानकात मनोज रविंद्रन पिल्लई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखडे हे करीत आहेत.
