कुंडल (ता. धडगाव) परिसरात २५ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. ललिता मोतीराम पाडवी असे सदर युवतीचे नाव असून ती शिरपूर (Shirpur)
येथे कंपनीत कामात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर युवतीचा बलात्कार करून खून झाला असल्याचा अंदाज असून डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा आहेत. उन्हामुळे शरीर काळवट पडलेल्या अवस्थेत मृतदेह आहे.
आई–वडीलांना केला होता फोन
शिरपुरहून शहादामार्गे (Shahada) धडगाव येत असल्याचा फोन ललीता हिने आई– वडिलांना केला होता. यानंतर मात्र सदर युवतीचा मोबाईल फोन बंद येत होता. यामुळे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध आई- वडील करीत होते. दरम्यान आज सदर युवतीचा मृतदेह आढळून आला. धडगाव पोलीस (Police) घटनास्थळी दाखल अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळावरून पाचशे मीटर अंतरावर बॅग कागदपत्रे व इतर सामान आढळून आल्याने मृतदेहाचा तपास लागला. धडगाव पोलिसांच्या मदतीने सदर युवतीचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार अधिक तपास लागण्याची शक्यता आहे.
