जळगाव : शहरातील एका तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. परंतू मित्रांनी पैश्यांसाठी तगादा लावल्याने त्याने आत्महत्या (Suicide) केली असून तिघांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
गोरख अशोक कोळी (वय २२) असे तरूणाचे नाव आहे
जळगाव (Jalgaon)
शहरातील हरविठ्ठलनगर परिसरात गोरख कोळी हा आई आणि लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. बांधकामाच्या ठिकाणी सेंटींगचे काम करून उदरनिर्वाह करत होता. गोरख कोळी हा त्याच्या मित्र सोनू कोळी याच्यासोबत राहत होता. दरम्यान, सोमवारी (२ मे) घरी कुणीही नसतांना गोरखने दुपारी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आल्याने समोर आले. याबाबत रामानंदनगर पोलीस (Police)
ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.
मित्रांनी संगनमताने दिला गळफास?
गोरख कोळी याचे मामा प्रल्हाद कोळी हे रामेश्वर कॉलनीत राहतात. गोरखने आत्महत्या केली असून त्याला गळफास देण्यात आला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोरखचा मित्र सोनू आणि इतर दोन जण त्याच्याकडे दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत होते. पैसे दिले नाही म्हणून तिनही मित्रांनी संगनमताने (Crime News) त्याला गळफास दिला; असा आरोप मयत गोरखची आई आक्का आणि मामा प्रल्हाद कोळी यांनी केला आहे. घटनास्थळी संशयास्पद स्थितीत गळफास घेतल्याने आढळून आले आहे.
