निलेश अशोक देशमुख यांनी नाशिकरोड पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांचा 40 वर्षीय भाऊ अमोल अशोक देशमुख याने मंगळवारी मॉडेल कॉलनीमध्ये रात्री राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती.
मुख्य म्हणजे अमोल यांचं पत्नीसोबत वाद सुरु असल्याने तो एकटाच राहत होता. त्यामुळे ते तणावात असल्याचंही पोलिसांना सांगितलंय. दरम्यान याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीये.
दुसरीकडे आशिष 30 वर्षीय अनिल पवार याने बुधवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतल्याचं आढळून आलंय. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेलीये.
तर तिसऱ्या घटनेत 23 वर्षीय आकाश राजेंद्र अहिरराव या तरूणाने बुधवारी सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीये.
