वसिम चौधरीच्या अडचणीत वाढ बलात्काराचा गुन्हा दाखल ३० मे पर्यंत पोलीस कोठडी

फुले शाहू आंबेडकर
0
अकोला : अकोल्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना रविवारी उघडकीस आली. चौधरी कोचिंग क्लासेसच्या संचालक वसिम चौधरी याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वसिम चौधरीला पोलिसांनी अटक केली. सोमवारी वसिमला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज ही मुदत संपल्याने वसिमला न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडीत वाढ झाली असून बलात्काराच्या गुन्ह्याही दाखल करण्यात आलाय. दरम्यान, वसिमला न्यायालयाने 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यानच्या काळात पोलीस तपास अधिकारी व पथकाने वसिमच्या घरी व इतर ठिकाणची झाडाझडती घेतली असता अनेक आक्षेपार्ह बाबी समोर आल्या आहेत. याबाबतचे पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणात आणखी गुन्ह्यांची वाढ केली असल्याने प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. वसिम चौधरीवर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आता भा दं वि कलम 375(C)(I) नव्याने समाविष्ट केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default