एकतर्फी प्रेमातून ६ मुलांच्या आईवर चाकूहल्ला; थरार CCTVत कैद

फुले शाहू आंबेडकर
0
देशात महिला अत्याचाराच्या तसेच गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला केल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना शहरातून समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर  एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने चाकूने हल्ला केला. तरुणाने भररस्त्यात महिलेला गाठत चाकूने सपासप वार केले. या घटनेत 48 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगावर या घटनेचा  व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलीस हल्लेखोर तरुणाचा शोध घेत आहेत. 
हैदराबाद शहरातील भररस्त्यात शुक्रवारी (27 मे) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय पीडित महिलेला 6 मुलं असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. आरोपी हा पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने पीडितेकडे लग्नाची मागणी सुद्धा घातली होती. मात्र पीडित महिलेनं तरुणाला लग्न करण्यास नकार दिला. याच रागातून आरोपी तरुण वेडा झाला आणि त्याने महिलेचा पाठलाग करून तिच्यावर चाकूने सपासप वार केले.
आरोपी तरुणाने केलेल्या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर जुने शहरातील हाफिज बाबा नगर येथील वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिला सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, महिलेवर आरोपीने हल्ला केलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक तरुण बुरखा घालून महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे, अचानक तो महिलेवर मागून लांब चाकूने हल्ला करताना दिसत आहे. जखमी महिला ही 6 मुलांची आई असून, तिचा शेजारी अनेक वर्षांपासून तिचा छळ करत होता आणि तिच्या मागे लागला होता, असे पीडित कुटुंबीयांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default