साडेसात लाखाचा गुटखा जप्‍त; जामनेर पोलिसांची कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : जामनेर तालुक्यातील नेरी ते जळगाव रस्त्यावर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला, तंबाखू घेवून जाणार कंटेनर पोलीसांनी पकडला. यात सुमारे ७ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे
जामनेर तालुक्यातील नेरी बु. ते नेरी टोल नाका दरम्यान कंटेनर (क्र. एमएच २०, ईएल ७५५२) या क्रमांकाच्‍या वाहनातून बेकायदेशीररित्या गुटखा, पानमसाला, तंबाखू घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ३० मे रोजी सकाळी साडेसहाला पथकासह धडक कारवाई करत सुमारे ७ लाख ४८ हजार ८०० रुपये किंमतीचा गुटख्यासह सामान आणि ८ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण १५ लाख ४८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दोन जण ताब्‍यात

याप्रकरणी पोहेकॉ तुषार पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सोहेल जाफर शेख (वय २१) आणि सचिन शंकर बनकर (वय २६, दोन्ही रा. बालाजीनगर, औरंगाबाद) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान जामनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default