सासुरवाडीला पत्नीला आणायला गेला; पतीने केलं भयंकर कृत्य

फुले शाहू आंबेडकर
0
गडचिरोली : सासुरवाडीला पत्नीला आणायला आलेल्या जावयाने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे ही घटना घडली आहे. या घटनेने गडचिरोलीच्या आष्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. योगेश बन्सोड असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मित मृत्यूची  नोंद केली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे 
मिळालेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय योगेश बन्सोड हे विवाहित असून नागपूरमधील रहिवासी आहेत. सोमवारी तो आष्टी येथील त्यांचे सासरे धनराज देठे यांच्या घरी पत्नी स्नेहा हिला नेण्यासाठी आला होता. रात्री जेवण झाल्यानंतर दोघा जोडपे सोबत बाहेर फिरायला गेले. दोघांनी सोबत बराच वेळ एकत्र गप्पा मारल्या. त्यानंतर हे दांपत्य झोपण्यासाठी घरी परतले. त्यांचे सासू-सासरे छतावर झोपण्यासाठी गेले. तर त्या दोघांनी घरात अंथरुण टाकले. त्यानंतर योगेश यांच्या सासू त्यांच्या उलटी करण्यचा आवाजाने खाली आल्या. त्यांना काय झालं विचारलं, त्यावेळी त्यांनी विष घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांच्या सासूला मोठा धक्का बसला.
 योगेश यांच्या सासूने त्यांना तातडीने आष्टी गावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, योगेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांना घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. मृत योगेशच्या आई-वडिलांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सदर मृत योगेशकडे पत्नीच्या नावाने चिठ्ठी आढळून आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default