तापी नदीला जोडणारी पुर्णा नदीच्या वरच्या बाजूला पाऊस झाल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हे पाणी हतनूर धरणात येत असल्याने धरणाची पातळी देखील वाढली आहे. यामुळे हतनूर धरणातून 4 ते 8 तासांमध्ये तापी नदी पात्रात हतनूर धरणांमधून पाणी प्रवाह सोडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार दुपारी धरणाचे दरवाजे उघडले आहेत.
सतर्कतेचा इशारा
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडून तापी नदी पात्रात 3955 क्युसेक्स वेगाने पाणी प्रवाह सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाने कळविले आहेत. यामुळे तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये; असे आवाहन देखील केले आहे.
