धुळे येथे ईडी चौकशीचा निषेध धुळ्यात काँग्रेसकडून रास्ता रोको

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. याविरोधात धुळ्यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहेत. ईडीच्‍या चौकशी संदर्भात निषेध करत धुळ्यात  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला
काँग्रेसचे नेते राहुल गांधी  यांची 13 जूनपासून ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. द्वेषभावनेने केंद्र सरकारकडून दडपशाही सुरु असल्याचा आरोप केला आहे. याचा निषेध करत काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील गांधी पुतळा येथे केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले आहे.

घोषणाबाजी करत रास्‍ता रोको

आंदोलनकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत या आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी रस्ता रोको देखील केला आहे. यावेळी पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default