सात बालकांवर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

फुले शाहू आंबेडकर
0
नागपूर: नागपूरात सात अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडलीय. बर्डी पोलीस स्टेशन हद्दीत महाराजबाग परिसरात ही घटना घडली असून सात मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वसंतराव नाईक झोपडपट्टी भागातील मुलांना चिंच आणि आंबे खाण्याच्या बहाण्याने महाराजबाग परिसरात घेऊन जायचा, त्यानंतर मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करायचा. 8 ते 11 वयोगटातील मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराची घटना घडलीय. पोलिसांनी आरोपी मयूर मोडक याला अटक केली असून त्याच्याविरोधात कलम ३७७ आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. एका मुलाच्या तक्रारीनंतर इतरंही पालक तक्रारीसाठी पुढे आलेय. आणखी कुणासोबत आरोपीने अनैसर्गिक कृत्य केलं का? याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी मानसिक विकृत आहेत का? याची तपासणी केली जातेय.
दरम्यान, देशात अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. रोज नव्या घटना मोबाईल आणि टिव्हीच्या माध्यमातून ऐकण्यात येत असतात. अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना मोबाईलमुळे होत असतात असे सांगण्यात येते. तरूणांकडून अल्पवयीन मुली-मुलांना टार्गेट केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default