पांझरा नदीपात्रात आढळला मुलाचा मृतदेह

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : धुळे शहरातील पांझरा नदीपात्रामध्ये आज सकाळी पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.
पांझरा नदीत मृत अर्भक आढळून आल्‍यानंतर परिसरातील नागरिकांनी या संदर्भातील माहिती शहर पोलीस अधिकाऱ्यांना दिली. घटनेची  माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी नदीपात्रातून हे मृत अर्भक ताब्यात घेत त्याला शासकीय रुग्णालयामध्ये पुढील तपासणीसाठी व शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे. पोलीस प्रशासनातर्फे या नवजात अर्भकाला अशा निर्दयपणे कोणी फेकले याचा तपास शहर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default