रहिमतपूरचे पाेलीस उपनिरिक्षक प्रमाेद सावंत यांनी दिलेल्या माहितीनूसार काेरेगाव तालुक्यातील राजेंद्र भिकु गायकवाड यांच्या घरात भाड्याने राहणेस असणा-या दत्ता नामदास याच्या समवेत याेगिता राहत हाेती. तिचा घातपात झाल्याचा संशय घटनास्थळी गेलेल्या पाेलीसांना आला. त्यामुळे पाेलीसांनी दत्ता नामदास याच्याबाबत परिसरात चाैकशी केली. त्यावेळी ताे गावात दिसला नसल्याची माहिती समाेर आली. ताे मूळचा राजेबाेरगाव येथे असल्याचे पाेलीसांना समजले.याेगीता ही नामदास याच्या साेबत राहत हाेती. नामदास याने याेगीता हिच्या दोन मुलांना विहिरीत ढकलून दिल्याची माहिती समाेर आली आहे.
चाैकशीअंती नामदास हा तिची बहीण ज्याेती अहिवळे यांच्या घरी असल्याचा संशय पाेलीसांना आला. त्यानूसार पाेलीस पथकाने अकलुज पाेलीस ठाणे येथे संपर्क साधत श्रीपुरबाेरगावंचे पाेलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून नामदास याच्याबाबत चाैकशी करण्यास सांगितले. या प्रकरणात श्रीपुरबाेरगावंचे पाेलीस पाटलांनी नामदास यास ताब्यात घेऊन अकलूज पाेलीसांच्या स्वाधीन केले.
रहिमतपूर पाेलीसांना दत्ता नारायण नामदास (मूळ राहणार राजेबोरगाव ता. जि. उस्मानाबाद सध्या राहणार वेलंग शिरंबे (तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा) याने दिलेल्या माहितीनूसार 15 जूनला याेगीता व तिची मुले समीर आणि तनु आणि त्याने रात्री जेवण केले. त्यानंतर सुमारे दहा वाजता झाेपी गेलाे. याेगिता हिचा परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे संशयातून तिचा गळा दाबून खून केला. तसेच समीर व तनु यांना परिसरातील एका विहीरीत ढकलून दिले.
दरम्यान या प्रकरणी नामदास याच्यावर पाेलीसांनी खूनाचा दाखल केला आहे. याेगिता हिचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबास धक्का बसला आहे.
