विवाहितेची आत्महत्या माहेरच्या मंडळींचा रुग्णालयात राडा पतीसह सासूला मारहाण

फुले शाहू आंबेडकर
0

बीड : बीडमध्ये  एका २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बीड शहरातील गजानन नगर भागात घडली आहे. मात्र, या महिलेची आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचा आरोप माहिरच्या मंडळींनी केला आहे.

दरम्यान, मयत महिलेला जिल्हा रुग्णालयात आणले असता, मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांनी पती, सासु आणि नंदेला जिल्हा रुग्णालयात  मारहाण करत राडा केला आहे.

सीमा निलेश राठोड असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. बीड जिल्हा रुग्णालयात रात्री साडेनऊच्या दरम्यान, गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह आणण्यात आला. त्यावेळी महिलेच्या माहेरच्या मंडळींनी, हॉस्पिटलमध्ये राडा करत सासू, पती आणि सासरच्या मंडळींना मारहाण देखील केली.

 जवळपास अर्धा तास हा धिंगाणा हॉस्पिटलमध्ये सुरू होता, त्यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांना माहिती दिली असता, तब्बल अर्धा तास उशिरा पोलीस (Police) पोहोचले. त्यानंतर सासू आणि इतर सासरच्या मंडळींना ताब्यात घेतले तर पती हॉस्पिटलमधून फरार झाला आहे.

मयत सीमाची आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी छळ करून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शिवाय नातेवाईकांनी रात्रीपासून प्रेत ताब्यांत घेतलं नाही. जोपर्यंत पती आणि सासरच्या मंडळींना अटक होत नाही, तोपर्यंत पोस्टमार्टम केले जाणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय ठिय्या मांडला होता. त्यामुळे काही काळ जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default