नाशिक: मेंढ्यांना विहिरीत पाणी देण्यासाठी गेलेल्या आई आणि मुलीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शीवारात ही घटना घडली आहे.
मिळालेली माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात ही घटना घडली. मेंढपाळ महिला आणि त्या महिलेची मुलगी एका विहिरीत मेंढ्यांना पाणी देण्यासाठी गेलेल्या, विहिरीत पाय घसरुन पडल्या. यात आई आणि मुलीचा बुडून मृत्यू झाला.
पपाबाई राजेंद्र गोयकार ( वय ३५) तर मुलगी मोनिका राजेंद्र गोयकर (वय १५) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. मोनिका राजेंद्र गोयकर ही पाय घसरून विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी तिची आई पपाबाई राजेंद्र गोयकार या गेल्या असता त्या विहिरीत पडून बुडाल्या. यात दोघी माय लेकींचा मृत्यू झाला असून, पिंपळगाव डुकरा गावात शोककळा पसरली आहे.
