चुलवड गावाकडून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रहदारीसाठी सदर रस्ता धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात उदय नदीला मोठ्या प्रमाणावर पुर येत असल्याने जर्ली गावाजवळील पूल याआधीच जीर्ण झाला आहे. दोन्ही बाजूला संरक्षण कठडे ही गायब झाले आहे. तसेच बांधकामातील सडया बाहेर आल्याने हा पूल धोकादायक ठरत आहे. त्याचबरोबर नदीतून पुलाखालील खालचा भाग पुरामुळे वाहून गेल्याने पुलाला तडे पडले आहे.
दुरूस्तीची मागणी
सदर रस्ता व पुलाचे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी अन्यथा पावसाळ्यात सदर रस्ता व पुल वाहून गेल्यास धडगाव तालुक्यातील जर्ली, बाहगया, राडीकलम, कालीबेल, पाडली, असली पर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर रस्ता व पुलाकडे वेळीच लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
