२१ वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून खून, मृतदेहाजवळ आढळलं गुलाबाचं फूल

फुले शाहू आंबेडकर
0

सांगली : सांगली जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी येथे तरुणाचा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला आहे. बनाप्पा बाळासाहेब म्हार्नुर वय २१ असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बनाप्पा म्हार्नुर हा गुरुवारी सकाळी ११ वाजता कवठेमहांकाळ-जत  रस्त्यावरील एका हॉटेलजवळ थांबला होता. त्यानंतर त्याला काही नागरिकांनी हॉटेलच्या पाठीमागे बंद पडलेल्या मिलजवळ पाहिले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बनाप्पा हा त्या ठिकाणी मृतावस्थेत आढळला.

बनाप्पाच्या डोक्यात मोठा दगड घालून मारेकऱ्यांनी तोंडाचा चेंदामेंदा केला आहे. तर त्याच्या मृतदेहाजवळ एक गुलाबाचे फूलही आढळून आले आहे. बनाप्पाचा खून हा गॅंगवार किंवा पूर्ववैमनस्यातून केला असल्याची चर्चा सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीसांनी  घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मारेकऱ्यांनी प्लॅन करून बनाप्पाचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नजरेला नजर मिळवणे आणि कोणाला मोठ्या आवाजात बोलले तरीही आता थेट त्याचा गेम केला जात आहे. खून, खुनी हल्ल्याच्या घटनांनी सांगली जिल्हा  हादरला आहे. पाच दिवसात सांगली शहरात दोन खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default