पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथून पती,पत्नी काम शोधण्यासाठी पुण्यात आले होते. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड परिसरात झोपण्यासाठी ते जागा शोधत होते. त्याचवेळी ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग याने दांपत्याला माझ्या बसमध्ये झोपा, एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार असं सांगितलं. आरोपीवर विश्वास ठेवून दोघे बसमध्ये आराम करण्यासाठी गेले.
पीडित महिलेचा पती लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरला असता आरोपीने संधी साधत बस दुसरीकडे नेली. ‘तू जर आरडाओरड केलीस तर जीवे मारुन टाकेन’ अशी धमकी त्याने महिलेला दिली. यानंतर स्वारगेटजवळ फुटपाथच्या बाजूला बस थांबून त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर कात्रज बसस्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबवून पुन्हा बलात्कार केला.
