जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील पटेलवाडी अवैधरीत्या साठवणूक केलेल्या घराची झडती घेतली. घराच्या एका कोपऱ्यात झाकून ठेवलेल्या पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या आढळून आल्या. यावेळी पथकाला संशय बळावल्याने अब्दुल शेख यास उग्र वास कशाचा येत आहे; अशी विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
९ हजार ३०० पाकिटे सापडली
पोलिसांनी उग्र वास येत असलेल्या पोत्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये विविध कंपनीच्या सुगंधित तंबाखूची 6 लाख 42 हजार 300 रुपये किमतीची 9 हजार 327 पाकिटे आढळून आली. गुन्ह्यातील आरोपी अब्दुल हमीद शेख यास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
