मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील अकोले आगारात काम करणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्याने माळशेज घाटात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. माळशेज घाटात दरीत उडी मारून एसटी कर्मचाऱ्याने जीवन संपवलं आहे. अकोले आगाराचे वाहक गणपत मारुती इदे, असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. गणपत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील रहिवासी होते.
कालच मंगळवारी एसटी कर्माचरी गपपत यांचा वेतन झाला होता आणि आज त्यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं, या घटनेमुळं परिसरात हळहळ वक्य होत आहे. एसटी संपानंतर ड्युटी मिळत नसल्याने पगार कमी झाला. ६०५६ रुपये एवढाच पगार झाल्याने कुटुंबाची आर्थिक ताणाताण झाली. या कारणामुळे एसटी कर्माचरी गपपत यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
