धुळे येथे बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात वाहतूक विभागाचा कारवाईचा बडगा

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : शहरातील वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात धुळे शहर वाहतूक नियंत्रण विभागातर्फे कारवाईचा बडगा उगारला आहे. यात वाहतुक शाखेने पंधरा रिक्षा चालकांवर  कारवाई केली आहे
धुळे  शहरातील विविध ठिकाणी थांबा नसताना देखील बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जवळपास दहा ते पंधरा रीक्षांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी  वाहतूक विभागातर्फे वारंवार बेशिस्त रिक्षा चालकांना वाहतुकीसंदर्भात सूचना तसेच आवाहन करण्यात आले होते. परंतु या आव्‍हानाकडे व वाहतूक विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाहतूक विभागातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले आहे.

नियम पाळण्याचे आवाहन

कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचे देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे बेशिस्त रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळत आपली वाहने चालवावी असे आवाहन यावेळी अधिकार्यांतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default