सीताबाई उर्फ शीतल गाडे असे मयत महिलेचे नाव आहे. शीतल हा ऊसतोड मजूर असून, त्यांना अगोदरच 9, 6, आणि 3 वर्षांच्या तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. परंतु, रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. त्यांनी याची कबुली दिली. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन पोलीस ज्यांनी गर्भपात केला या ठिकणी पोहचले.
