जोरदार वाऱ्याने उडाले घराचे छप्पर; घरातील आई व बाळाला दुखापत

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले नसले; तरी सोसाट्याचा वारा सुरु झाला आहे. यामुळे तळोदा तालुक्यातील सीतापावली गावात गोविंद ठाकरे या शेतकऱ्याचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील सिमेंटचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. 
अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गोविंद ठाकरे यांच्या घरावरील छप्पर पूर्णपणे हवेत उडून गेल्याने धान्य व घरगुती  सामानाचे नुकसान झाले आहे. सोबत अत्यावश्यक कागदपत्रे देखील उडून गेली आहे. तसेच घरात असलेले सात महिन्याचे बाळ व आईला किरकोळ दुखापत झाली आहे. संबंधित ग्रामपंचायतचे तलाठी कविता पारचूरे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन पंचनामा करून मदत दिली जाणार अशी माहिती दिली आहे.

भाजप कार्यकर्त्यांकडून पाच हजाराची मदत

ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला घरावरील छप्पर उडून निवाऱ्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने तत्काळ मदत मिळावी; अशी मागणी परिवाराने केली आहे. नुकसानग्रस्त परिवाराची हालाखीची परिस्थिती पाहून तळोदा भारतीय जनता पार्टीचे  ग्रामीण कार्यकर्त्यांच्यावतीने नुकसानग्रस्त कुटुंबाला पाच हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली आहे. महसूल विभागाने देखील कार्यवाही करून लवकर मदत करावी अशी मागणी गोविंद ठाकरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default