पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, भोकर तालुक्यातील पांडुरंगा गावात काल रात्री एका आईने दोन वर्षाच्या मुलासह चार महिन्याच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या आईची आणि भावाची मदत घेतली. तिघांनी मिळून दोन्ही मुलांचे मृतदेह जाळून टाकले.
ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. धुरपतबाई निमलवाड असं हत्या करणाऱ्या क्रुरकर्मा आईचं नाव आहे, दत्ता आणि अनुसया असं खून झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. धुरपतबाई ला तीची आई कोंडाबाई राजेमोड, भाऊ माधव राजेमोड यांनी चिमुकल्यांचे मृतदेह जाळण्यास मदत केली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. धुरपतबाई हीच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत क्रुरकर्मा आईसह तिघांविरोधात भोकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
