तहसिलदाराला पैशाचा मोह सुटेना, दीड लाखांची लाच स्वीकारताना अटक!

फुले शाहू आंबेडकर
0

वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे

लातूर, 04 जून :  वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी चक्क तहसिलदाराने महिना 30 हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडला आहे. तब्बल दीड लाखांची लाच घेताना तहसीलदाराच्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करण्यात आली आहे.

निलंगा तालुक्यात वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तहसिलदार गणेश जाधव आणि एक एजंट रमेश मोगेरगे यांना अटक करण्यात आली आहे.

तहसीलदार गणेश जाधव याने आपल्या एजंटच्या मदतीने तक्रारदार दाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी आणि वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले होते.  यासाठी प्रती ट्रक 30,000/- रूपये प्रमाणे दोन ट्रकचे 60,000/- रूपये प्रति महिने असा व्यवहार ठरला होता.  तीन महिन्याचे 1,80,000/- रूपये झाले होते.  प्रत्यक्ष लाच मागणी करून तडजोडी अंती  1,50,000 रुपयांवर ठरलं होतं 

त्यानंतर या तहसीलदाराने  एजंट रमेश मोगेरगे याच्याकडे पैसे देण्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे तक्रादाराने रमेश मोगेरगे याना निलंगा येथे तहसीलदाराच्या घरासमोर बोलावले.  तिथे  1,50,000/- रूपयांची रक्कम देत असताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ अटक केली. त्यानंतर तहसीलदार गणेश जाधवला  अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस सुरू आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default