धुळे येथे पुढील दोन दिवसात सत्तेत बदल दिसतील; भाजप खासदाराच्या भाकीताने खळबळ

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : राज्‍यात सध्‍या सुरू असलेल्‍या राजकीय घडामोडीमुळे महाविकास आघाडी सरकार पडणार की काय अशा चर्चा सध्या संपूर्ण राज्यात सुरू आहे. अशात भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी प्रतिक्रीया देताना राज्‍यातील सत्‍तेत दोन दिवसात बदल होणार असल्‍याचे भाकीत केले आहे.
राज्‍यातील विधान परिषदेच्‍या निवडणूकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्‍का दिला आहे. यामुळे राज्‍यात भाजप कार्यकर्ते जल्‍लोष करत आहेत. धुळ्यात देखील भाजपाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे भाजपाच्या कार्यालयाबाहेर फटाके वाजवून जल्‍लोष करण्यात आला आहे.
पुढील दोन दिवसात सत्तेत बदल दिसेल असे भाकीत माजी संरक्षण राज्यमंत्री तथा भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केले असून, भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. प्रामुख्‍याने शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर धुळ्यात भाजपचा जल्लोष बघायला मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default