पिंप्री (ता.पाचोरा) येथील रहिवासी तेजसबाई पुना जाधव या घरी एकट्याच असतात. ३१ मे रोजी सायंकाळी घराचे लाईट अद्याप का लागले नाहीत? यासाठी सदर माहिती गावातील नातेवाईक यांना कळविण्यात आली. यानंतर नातेवाईकांनी आत बघितले असता तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करत खुन झाल्याचे समोर आले. याबाबत नगरदेवळ आऊटपोस्टला कळविण्यात आल्यानंतर नगरदेवळा आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनाक्रम वरिष्ठांना कळविल्यानंतर पोलीस प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले
खूनाचे कारण गुलदस्त्यात
मंगळवारी (३१ मे) च्या सायंकाळी साडेपाच ते आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करत खुन केला. यानंतर विळा तेथेच सोडत तेथून पोबारा केला. खून नेमका कशासाठी झाला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भारत काकडे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पाचोरा पोलीस स्टेशनचे किसनराव पाटील यांच्यासह पथक दाखल झाले असुन तपासचक्र वेगाने फिरू लागली आहे.
