पुणे :दुचाकी चोरट्याला पकडले १३ दुचाकी जप्त पुणे, मुंबई नागपूरमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे

फुले शाहू आंबेडकर
0
पुणे, मुंबई, नागपूर तसेच नगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्याकडून सहा लाख रुपयांच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
मोन्या उर्फ विनोद आनंद कांबळे (वय ३०, रा. हिराबाई झोपडपट्टी, लांडगे चाळ, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. कांबळेने पुणे शहरातून दुचाकी लांबविल्या होत्या. चंदननगर भागातून त्याने काही महिन्यांपूर्वी दुचाकी लांबविली होती. गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून तपास करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार कांबळेला विमाननगर भागात सापळा लावून पकडले. त्याची चाैकशी करण्यात आली. कांबळेने पुणे शहरातून नऊ दुचाकी लांबविल्याचे उघडकीस आले तसेच मुंबई, सांगली, अहमदनगर, नागपूर शहरातून प्रत्येकी एक दुचाकी लांबविल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कांबळेकडून सहा लाख रुपयांच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गु्न्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे आदींनी ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default