धक्कादायक! आईने गेम खेळण्यास मोबाईल दिला नाही १६ वर्षीय मुलाने ट्रेनसमोर मारली उडी

फुले शाहू आंबेडकर
0

मुंबई: आईने मोबाईलवर  गेम खेळण्यास नकार दिल्याने १६ वर्षाच्या मुलाने ट्रेनसमोर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोरिवली जीआरपीने एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

याबाबत दिंडोशी पोलिसांकडून  मिळालेली माहिती अशी की, सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ओम भरत हा आपल्या घरात बसून मोबाईलवर गेम खेळत होता, त्यावेळी आईने मुलाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि दिवसभर खेळणार तर अभ्यास कधी करणार असे म्हणत ओरडले. यानंतर ओम भरतने सुसाईड नोट लिहून घर सोडले.

काही वेळाने ओमची आई घरी पोहोचली, तेव्हा तिला एक चिठ्ठी पडलेली दिसली. या चिठ्ठीमध्ये मी आत्महत्या करणार आहे. मी पुन्हा कधीच येणार नाही, असे लिहिले होते. सुसाईड नोट मिळताच कुटुंबीयांनी नजीकच्या दिंडोशी पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी  मुलाचा शोध सुरू केला.

मालाड ते कांदिवली स्थानकादरम्यान कोणीतरी आत्महत्या केल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, यावळी त्यांना एका मुलाचा मृतदेह मिळाला. चौकशीत हा मृतदेह ओम याचा असल्याचे समोर आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default