सोलापूर : सोलापूरमधील एका सेवानिवृत्त पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्याण गावासाने असं आत्महत्या केलेल्या मृत हवालदाराचं नाव आहे.
कल्याण गावासाने यांनी सोलापुरातील माशाळ वस्ती येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गावसाने यांनी नासिक मध्यवर्ती कारागृहातून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. सेवा निवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या पेन्शनसाठी कारागृह प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत हवालदाराच्या़ कुटुंबीयांनी केला आहे.
कल्याण गावसाने यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून त्यांना पेन्शनसाठी मानसिक त्रास दिला जात होता त्यामुळे या आत्महत्ये प्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील आवारे मॅडम आणि गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा गावसाने कुटुंबीयांनी प्रशासनाला दिला आहे.
