दारूच्या नशेत जावयाने सासू सासर्‍यांचा केला खून पत्नीसह मुलगी गंभीर जखमी आयसीयूत दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
नागपूर : दारूच्या नशेत मध्यरात्री वृद्ध सासू-सासर्‍यांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अमर नगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर  दारूच्या नशेत मध्यरात्री वृद्ध सासू-सासर्‍यांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना  एमआयडीसी  पोलीस स्टेशन  अंतर्गत येणा-या अमर नगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. 
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत अमर नगर परिसरात दुहेरी हत्याकांड झाले असून पाेलीस घटनास्थळी पाेहचले आहेत. प्राथमिक माहितीनूसार नरमु यादव या व्यक्तीने दारूच्या नशेत मध्यरात्री त्याच्या वृद्ध सासू-सासर्‍यांवर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत भगवान रेवारे आणि पुष्पा रेवारे गंभीर जखमी झाले हाेते. त्यांचा मृत्य झाला आहे. 
या घटनेत यादव याची पत्नी कल्पना व मुलगी मुस्कान या दोघींवर देखील कुऱ्हाडीने वार झाल्याचे समजते. त्या दोघांची स्थिती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अधिक माहिती घेतली असता यादव कुटुंब यांच्यात गेले तीन-चार दिवसांपासून वाद सुरू होते. नरमु यादवने दारूचे नशेत पुन्हा वाद उकरून काढले आणि त्यात दाेघांची हत्या केली. या घटनेचा तपास पोलीस कसून करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default