पिलरची केली पाहणी
पाचही विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी थेट गिरणा नदीपात्रात जाऊन निमखेडी, बांभोरी रेल्वे पुलाची पाहणी केली. वाळू माफियांनी पुलाच्या पिलरजवळील वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याचे दिसून आले. पिलरजवळ जर अधिक उपसा झाला तर पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. यामुळे रेल्वेने याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. महसूल, पोलिस यंत्रणा वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी उपाय योजना करीत असते. मात्र पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने रेल्वेने पुलाची सुरक्षा स्वतः करावी असे सूचविण्यात आले. त्यावर आरपीएफचे एक पथक या दोन्ही पुलाखाली चोवीस तास तैनात ठेवण्याचे ठरविण्यात आले.
सीसीटीव्हीची मागणी
सोबतच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. पुलाजवळील परिसरात मोठी वाहने येणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याचे सूचविण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, सहाय्यक पोलिस अधीक्षक वाकचौरे, तहसिलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक कुंभार, सहाय्यक निरीक्षक बुवा, रेल्वेचे अभियंता महेंद्र पाटील, मेश्राम, आरपीएफचे अधिकारी, आरटीओ विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
