बियाण्यांवरून व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, लोखंडी हूक....; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : दोन व्यापाऱ्यांमध्ये ग्राहकावरून झालेल्या बाचाबाचीत एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाराच्या पोटात धारदार लोखंडी हुक पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार शिरपूर येथे उघडकीस आला असून या सर्व घटनेचा थरार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये  कैद झाला आहे. 
आपल्या दुकानात बियाणांची विचारणा करून बाजूच्या दुकानावर ग्राहक गेला. या रागातून व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याचा पोटात पोत्यातून धान्य काढण्याचा लोखंडी हुक खुपसुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. शहर पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली असून दुसरा संशयित अद्याप फरार आहे.
जखमी झालेल्या व्यापाराच्या पोटात धारदार हुक घुसल्याने मोठ्या प्रमाणात जखमा पोटावर झाल्या आहेत. यामध्ये जखमी व्यापारी थोडक्यात बचावला असून सध्या खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default