दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील बसस्थानकाच्या मुख्य रस्त्यावरील असलेल्या शासकीय वस्तीगृहात विद्यार्थीनीने ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 15 रोजी सायंकाळी घडली होती. त्याठिकाणी गृहपाल रीना गिरीधारीलाल जाधव या घटनास्थळी नव्हत्या. त्यानंतर त्यांना काळविण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी नसल्याने एक जबाबदार अधिकारी नसल्याने नातेवाईकांसह उपस्थितांनी संताप व्यक्त केला होता. त्याची दखल घेत प्रकल्प अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी येथील प्रभारी गृहपाल ह्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी गृहपाल रीना जाधव यांचे निलंबनाचे आदेश पारित केले आहे. मात्र हे प्रकरण आणखी सखोल चौकशी केली तर काय वळण घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विद्यार्थीनी आत्महत्या प्रकरण; वसतीगृहातील गृहपाल तडकाफडकी निलंबित
शुक्रवार, जून १७, २०२२
0
निमगूळ (धुळे) : शासकीय वस्तीगृहात विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. वसतीगृहाच्या गृहपाल घटनास्थळी उपस्थीत नसताना त्यांना कळविल्यानंतर देखील त्या आल्या नाही. या कारणावरून गृहपाल श्रीमती जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.
Tags
