आमदार पतीला शोधण्यासाठी पत्नीची सूरतकडे कूच; पतीसोबत विपरीत घडल्याचा संशय

फुले शाहू आंबेडकर
0
अकोला : अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापुरचे आमदार नितीन देशमुख  हे सध्या मंत्री एकनाथ शिंदे  यांच्यासोबत नॉट रिचेबल आहे. आज सकाळी आमदार नितीन देशमुख यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख या आता आपल्या पतीला शोधण्यासाठी सूरतला रवाना होणार आहे. पतीसोबत काही विपरीत झाल्याचा संशय प्रांजली देशमुख यांनी व्यक्त केला. काळजी वाटत असल्यानेच हा निर्णय घेतल्याचं प्रांजली देशमुख यांनी म्हटलं आहे 

आज सकाळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. ही माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. शिवसेनेवर नाराज असलेले मंत्री एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या. यादरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातील शिवसेना आमदार यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, आमदार नितीन देशमुख नॉट रिचेबल झाले असल्याचं कळताच, त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी आपले पती हरवले असल्याची तक्रार पोलिसांत केली. रात्रीपासूनच ते संपर्कात नसल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. सोबतच्या लोकांनाही ते कुठे आहेत हे माहित नसल्याची माहिती आहे. आपल्या पतीला लवकर शोधा, अशी विनंती आमदार देशमुख यांच्या पत्नी प्रांजली यांनी पोलिसांकडे केली. त्यातच देशमुख यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं कळताच प्रांजली यांच्या पायाखालची जमीनच सरकली 

आपल्या पतीसोबत काही विपरीत झाल्याचा संशय व्यक्त करत, फार काळजी वाटत असल्यानेच हा निर्णय घेतल्याचं प्रांजली देशमुख यांनी सांगितलं आहे. आपल्याला आपल्या पतीशी भेटायला कुणीच रोखू शकत नसल्याचं त्या म्हणाल्यात. त्यांच्यासोबत काही तरी विपरीत झाल्यानेच त्यांना दवाखान्यात भरती करावं लागल्याची भिती प्रांजली यांनी व्यक्त केलीये. आपल्याशी आपले पती नितीन देशमुखांचं बोलणं करून द्यावं, अशी विनंती प्रांजली यांची एकनाथ शिंदेंना केलीये.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default