असली गणात कॉंग्रेस
चितवी जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार सुनील सुरेश गावित यांचे वडील या गटाचे सदस्य होते. परंतु त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सदस्य पद रिक्त झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. अखेर सुनील सुरेश गावित यांनी 2 हजार 319 मतांनी विजयश्री खेचून आणला आहे. तर दुसरीकडे धडगाव पंचायत समितीतील असली गणात पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार सोनिया सिफा वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी झाले आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात महा विकास आघाडीने पोटनिवडणुकीत सरशी मिळवली आहे.
सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कल्पना निळे-ठुबे, नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ, आदी अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक व मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी चोख भूमिका बजावली आहे.
