अहमदनगरमध्ये खळबळ! प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळं जेष्ठ माजी सैनिकाचा आत्मदहनचा प्रयत्न

फुले शाहू आंबेडकर
0
अहमदनगर : जिल्ह्यात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. अहमदनगर  जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेच्या आवारात माजी सैनिकानेआज अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घराशेजारील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी अनेकदा तक्रार करुनही प्रशासन कारवाई करत नसल्याने माजी सैनिक  दिवाकर सयाजी मकासरे (74) वर्ष यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. मकासरे यांना हे कृत्य करताना नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात उभे असलेल्या नागरिकांनी पाहिल. त्यानंतर नागरिकांना तातडीनं मकासरे यांना रोखल्याने त्यांचा जीवाला धोका निर्माण झाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाकर मकासरे यांनी 17वर्ष भारतीय सैन्यदलात सेवा केली आहे. 1971 च्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत त्यांनी देशसेवा केली आहे.तसंच सेवानिवृत्त झाल्यानंतर मकासरे कोपरगाव शहरातील निंबारा मैदान येथे राहायला गेले.शेजारिल नागरिकाच्या अतिक्रमणाचा नाहक त्रास होत असल्याने 2016 पासून त्यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
संबंधीत प्रशासनाने तक्रारीची दखल घेतली नसल्याने टोकाचं पाऊल उचललं, असं मकासरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. दिवाकर मकासरे यांनी पालिका आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला असता, त्यांची मुख्याधिकारी यांनी समजूत काढली व तत्काळ सदर ठिकाणी भेट देऊन वादावर तोडगा काढला, अशी प्रतिक्रिया कोपरगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिलीय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default