कामावरुन परतलेल्या आईसमोर भयावह दृश्य, २२ वर्षीय मुलाचा मृतदेह पाहून टाहो

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : आई कामावरुन घरी परत आली, त्यावेळी घरात मुलाचा मृतदेह दिसल्याने तिला मोठा धक्का बसला. जळगाव जिल्ह्यातील कांचन नगर परिसरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील कांचन नगरातील २२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी १४ जून रोजी सायंकाळी समोर आली होती. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन हिरामण सोनवणे (वय २२ वर्ष, रा. भैय्याची वखारीजवळ, कांचन नगर, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन सोनवणे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चेतनची घरची परिस्थिती हालाखाची असल्याने त्याची आई मोलमजूरी करून उदरनिर्वाह करते. मंगळवारी १४ जून रोजी सकाळी चेतनची आई कामावर गेली होती. चेतन सोनवणे हा घरी एकटा असताना दुपारी ३ वाजता राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सायंकाळी चेतनची आई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. शेजारच्या लोकांच्या मदतीने त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default