अमरावतीत अल्पवयीन अद्यापही सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा पुढे आल आहे. एका अल्पवयीन मुलीला चक्क पेढ्यातून गुंगीच औषध देऊन, तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता तिच्या मामाच्या गावाला असताना आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर 12 जूनच्या रात्रीला तिला चारचाकीमध्ये बसवून गुंगीच औषध देत तिचे लचके तोडले आहे.
पेढ्यात गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीचं अपहरण आरोपींनी धावत्या कारमध्ये केला सामूहिक बलात्कार
गुरुवार, जून १६, २०२२
0
अमरावती : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता अमरावती मधून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आहे. अमरावतीमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Tags
