महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी! 92 नगरपरिषदेच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं, ओबीसी आरक्षणाचं काय?

फुले शाहू आंबेडकर
0

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर केला आहेत. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होईल. तर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Reservation) तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या निवडणुकादेखील ओबीसींच्या आरक्षणाशिवाय पार पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जातील? असा प्रश्न अनेकांना होता. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन या निवडणुकांचा मुद्दा प्रचंड गाजला होता. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप सूटलेला नाही. पण सुप्रीम कोर्टाने या निवडणुकांबाबत महत्त्वाचा आदेश दिला होता. पावसाचं नियोजन करुन आठ-पंधरा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना कोर्टाने दिला होता. कोर्टाने 17 मे रोजी याबाबतचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायचीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार असल्याने भर पावसात या निवडणुका होण्याची चिन्हं आहेत.

सुप्रीम कोर्टाने 17 मे 2022 रोजी महत्त्वाचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत त्याठिकाणी आणि तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तात्काळ राबवावा. तसेच आवश्यक असल्यास परिस्थितीनुसार त्यात बदल करवेत, असे आदेश कोर्टाने दिले होते. याच आदेशानुसार भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन निवडणुकीचा कार्यक्रम ठरविल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे 

निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषदा आणि 4 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्याबाबतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ज्या नगरपरिषदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या भागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default