अवैध सावकारी प्रकरणात संजय बंब याच्या विरोधामध्ये आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर संजय बंब हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता. त्याचा शोध धुळे पोलिसांतर्फे घेण्यात येत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतर गुप्त माहिती दाराच्या मार्फत यासंदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संजय बंब यास मालेगाव येथून ताब्यात घेतले आहे.
रोकड, चेक, पावत्या हस्तगत
संजय बंब याच्या लॉकर्समधून पोलिसांनी छापा टाकत यापूर्वी मोठ्या प्रमाणात रोकडसह सह्या असलेले चेक त्याचबरोबर स्टॅम्प पेपर व फिक्स डिपॉझिटच्या मोठ्या प्रमाणात पावत्या हस्तगत केल्या होत्या. या अनुषंगाने आता पुढील कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
