रात्रीच आढळले मृतदेह
मात्र २९ जूनला रात्री साडेदहा वाजेपूर्वी रितेश व महेश पावरा या चिमुकल्यांसह पत्नी ईला मनोज पावरा (वय २५) यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी येत पाहणी केली. यावेळी एकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याने मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढत पती मनोज पावरा यांनी पत्नी व एक मुलाचा तपास नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजून विहिरीच्या तळाला तपास केला. तेव्हा दोघांचेही मृतदेह मिळून आले. दरम्यान मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि लोकेश पवार हे करीत आहे.
