आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, आज मुक्ताईनगरात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली. त्याच्याच रागातून आज माझ्या कार्यकर्त्याला महिलेसह जमावाने मारहाण केला.
मुक्ताईनगरात संबंधित गुंडांकडून नेहमी अशाच प्रकारच्या घटना घडत असून या गुंडांवर कठोर कार्यवाही यासाठी लवकरच औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल करणार असल्याचेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, मुक्ताईनगर येथील नगरसेविका पुत्रास मारहाण केल्या प्रकरणी पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत, चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे
काय आहे प्रकरण?
एका तरुणीसह तिच्या कुटुंबियांचे सहलीचे फोटो चुकीचे संदर्भ देवून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगर येथे घडला होता. यावरुन तरुणीसह तिच्या आईने तो व्हायरल करणाऱ्या नगरसेविकेच्या मुलाला भररस्त्यात चांगलाच चोप दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. संतापात तरुणीसह तिच्या आईने संबंधित तरुणाला कपडे फाटेपर्यंत मारले. अनिम खान असे या नगरसेविकेच्या मुलाचे नाव असून तो एकनाथ खडसे समर्थक असल्याची माहिती महिलेने पत्रकारांशी बोलतांना दिली आहे. यावरुन मुक्ताईनगरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
