नागपुरात जीम ट्रेनर निघाला अट्टल चोर; दिवसा जीम ट्रेनर अन् रात्री घरफोडी

फुले शाहू आंबेडकर
0

नागपूर - तरुणांमध्ये आजकाल लक्झरीया लाईफ जगायचं फ्याड आला आहे. त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात मग चोरी का नसो असाच एक प्रकार नागपूर शहरांमध्ये उघड झालेला आहे. नागपूर पोलिसांनी ऐका चोराला त्याच्या दोन साथीदारासह अटक केली आहे. पण यातील एक आरोपी चक्क दिवसा जीम ट्रेनर  म्हणून काम करतो आणि  रात्री घरफोडी करतो. याच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या टोळीतील एकूण तीन जणांसह एका सराफा व्यापाऱ्याला देखील पोलिसांनी 25 लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.

हे तिघेही अनेक दिवसांपासून घरफोड्या करायचे. चोरीचा माल त्यांनी हंसापुरीतील सराफा व्यापाऱ्याला विकला होता. इम्रान खान हमीद खान, अफसर खान अख्तर खान सय्यद नौशाद अली सय्यद कलिमुद्दीन अली , विकास ऊर्फ रिंकू गौरीशंकर गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी इम्रान खान हा जीम ट्रेनर असून आरोपी अफसर खान चिकन शॉप चालवतो तर नौशाद प्लास्टिकच्या वस्तू विकतो. फिर्यादी उद्योजक फैजान 20 जून रोजी कुटुंबीयांसह भोपाळला गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराचे कुलूप तोडून17 लाखांचे दागिने चोरून नेले.

मानकापूर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. त्यात आरोपींचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला आहे. आरोपींनी चोरीचा माल हंसापुरी येथील सराफा विकास ऊर्फ रिंकू गुप्ता याला विकला होता. पोलिसांनी गुप्ता यालाही अटक केली तसेच तीन दुचाकी, दागिने असा सुमारे 25 लाखांचा माल जप्त केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default