केंद्र सरकारच्या माध्यमातून खाण्यापिण्याच्या व जिवाणावश्यक सर्वच वस्तूंवर जीएसटी लावण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्यावतीने केला आहे. या संदर्भात आवाज उठवल्या गेल्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर केंद्र सरकारच्या माध्यमातून ईडीच्या कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने लावण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर देखील ईडीकडून चौकशीचे सत्र सुरू करण्यात आला आहे.
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ कॉंग्रेसकडून निषेध
बुधवार, जुलै २७, २०२२
0
धुळे : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारच्या या ईडी धोरणाविरोधात धुळ्यात काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले.
Tags
