चड्डी बनियान गँगने चोरीच्या इराद्याने नवापूर शहरातील घाचीवाड्यात प्रवेश केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला. अल शिफा हॉस्पिटल परिसरामध्ये रात्री एक वाजेच्या दरम्यान चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चोरटे घरात शिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने नवापूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नवापूर पोलीस अधिक तपास करीत आहे.
चड्डी बनियन चोरट्यांची गँग सक्रिय; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले कैद
मंगळवार, जुलै २६, २०२२
0
नंदुरबार : नवापूर शहरात चड्डी बनियान टोळीचा धुमाकूळ सुरू झाला आहे. २३ जुलैच्या मध्यरात्री चार चोरटे नवापूर शहरातील घाचीवाडी अल सिफा हॉस्पिटल नजीक चोरी करत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे
Tags
